25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय कमकुवत शेतकरीच स्वत:ला संपवतात

कमकुवत शेतकरीच स्वत:ला संपवतात

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : नव्या कृषि कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांचा मुद्दाही सातत्यानं चर्चेत येतं आहे. अशात भाजपाचे कर्नाटकातील कृषि मंत्री बी. सी. पाटील यांनी वादग्रस्त विधान केले. जे शेतकरी आत्महत्या करून स्वत:च आयुष्य संपवतात, ते मनाने कमकुवत असतात. त्यासाठी सरकारला दोष देता येणार नाही, असे विधान पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे वादंग होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकचे कृषि मंत्री बी.सी. पाटील मैसूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्यावर भाष्य करताना हे विधान केले. शेतक-याकडून घेतल्या जाणा-या या टोकाच्या निर्णयाला सरकारची धोरणे कारणीभूत नाहीत. फक्त शेतकरीच नाही, तर उद्योजकही आत्महत्या करून जीवन संपवतात. सर्वच आत्महत्यांना शेतकरी आत्महत्या म्हणू शकत नाही, कृषिमंत्री पाटील म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी शेतक-यांविषयी असेच एक विधान केले होते़ जे शेतकरी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विचार न करता, आपले आयुष्य संपवतात, ते घाबरट असतात. आत्महत्या करणारे शेतकरी भेकड असतात. पत्नी आणि मुलांचा सांभाळ करू न शकणारे भेकड असतात. तेच आत्महत्या करतात. जर आपण पाण्यात पडलो आहोत, तर आपल्या पोहायला आणि जिंकणे शिकायला हवे, असे विधान पाटील यांनी केले होते़

गुजरात सरकारने ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या