18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयदिल्लीत अतिरेक्यासह शस्त्रे, दारुगोळा जप्त

दिल्लीत अतिरेक्यासह शस्त्रे, दारुगोळा जप्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तो ओळख लपवून १५ वर्षांपासून दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागात राहत होता. तपासादरम्यान त्याच्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. मोहम्मद अशरफ अली असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अशरफ अली मौलाना म्हणून भारतात राहत होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ही कारवाई केली. दहशतवाद्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्याने ही शस्त्रे वाळूमध्ये लपवून ठेवली होती.

पोलिस उपायुक्त प्रमोदसिंग कुशवाह यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारा मोहम्मद अशरफ उर्फ ​​अली याने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय ओळखपत्र मिळवले होते. तो भारतीय नागरिक म्हणून दिल्लीत राहत होता. त्याच्याकडून एके-४७ रायफल, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना स्वत: विशेष कक्षाच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते.

या प्रकरणाची अधिक माहिती देताना दिल्ली पोलिस अधिका-याने सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली की, एक दहशतवादी लक्ष्मी नगरमध्ये लपला आहे आणि येत्या काही दिवसात काही तरी मोठी कारवाई करू शकतो. माहितीच्या आधारे छापे टाकण्यात आले आणि अलीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. यामध्ये तुर्कमन गेट येथील कालिंदी कुंज येथून भारतीय पासपोर्ट, शस्त्रे आणि बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

स्लिपर सेलमध्ये सहभाग
भारतीय ओळख वापरून अशरफ मागच्या १५ वर्षांपासून भारतात आहे. प्राथमिक तपासात स्लीपर सेल म्हणून त्याचा सहभाग उघड झाला, जो विध्वंसक कारवाया करत होता, असे पोलिस उपायुक्त स्पेशल सेल प्रमोद कुशवाह यांनी सांगितले. जम्मू -काश्मीर, उर्वरित भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याच्या सहभागाची माहिती दिली.

आयएसआयने दिले प्रशिक्षण
अशरफ अलीला पाकिस्तान आयएसआयने प्रशिक्षण दिले आहे. आम्ही त्याच्या इतर सहका-यांचा शोध घेण्याचा ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रमोद कुशवाह म्हणाले. त्याने अनेक बनावट ओळखपत्रे बनवली होती. त्यापैकी एक अहमद नूरीच्या नावावर होते. त्याने भारतीय पासपोर्टही मिळवला होता. कागदपत्रांसाठी त्याने गाझियाबादमधील एका भारतीय महिलेशी लग्न केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या