34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeराष्ट्रीयआठवड्याचे लॉकडाउन परिणामकारक नाही; केंद्राने महाराष्ट्राला दिला होता सल्ला

आठवड्याचे लॉकडाउन परिणामकारक नाही; केंद्राने महाराष्ट्राला दिला होता सल्ला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्रचंड वेगाने होत असलेले कोरोनाचे संक्रमण आणि वाढत्या रुग्णसंख्येला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे निर्बंध मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून लागू झाले आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी आणि आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी दोन दिवस असणाºया लॉकडाउनची कोरोना रोखण्यास फार मदत होणार नसल्याचा सल्ला केंद्राने महाराष्ट्राला दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी यांपूर्वी झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या सचिवांना याबद्दल सूचना केल्या होत्या, अशी माहिती आता समोर आली आहे.

एका अधिकाºयाने याविषयीची माहिती दिली. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या एका बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबद्दल सूचना केल्या होत्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची उच्च स्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांना बोलण्यासाठी भरपूर वेळ देण्यात आला होता. त्यावेळी आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन लावण्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती, अशी माहिती वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

१५ मार्च रोजी राज्यात १६ हजार ६२० नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्रही पाठवले होते़ ज्यात लॉकडाउन न लावता कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्याची सूचना केली होती. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन यासारखे उपाय संक्रमण रोखण्यात फार प्रभावी नाहीत. त्याऐवजी जिल्हा पातळीवरील प्रशासनाने कंटेनमेंट उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर द्यायला हवा, असे भूषण यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेले होते़

 

परभणी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार वरपुडकर, उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या