नवी दिल्ली : सीएए कायद्याच्या निषेधार्थ फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत जातीय दंगली झाल्या होत्या. त्यात शाहरुख पठाण नावाच्या आरोपीने पोलिसांवर बंदूक ताणली होती. याप्रकरणी शाहरुखला अटक झाली होती. सध्या तो तुरुंगात असून दोन दिवसांखाली वडीलांना भेटण्यासाठी आला असतानाच्या त्याच्या व्हिडिओने पुन्हा वादंग निर्माण केले आहे.
घरी येत असताना त्याचे स्थानिक लोकांकडून जंगी स्वागत झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. शाहरुखला काही तासांसाठी पेरोलवर बाहेर काढले होते. त्याच्या आजारी वडीलांना भेटण्यासाठी तो घरी गेला होता, असे सांगण्यात आले आहे. शाहरुखवर दंगल भडकावणे, खुनाचा प्रयत्न, धार्मिक शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्याचे आरोप आहेत.