30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय वेल डन इंडिया; भारताचे संयुक्त राष्ट्राकडून कौतुक

वेल डन इंडिया; भारताचे संयुक्त राष्ट्राकडून कौतुक

एकमत ऑनलाईन

जीनिव्हा : कोव्हिड प्रतिबंधक लस जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करण्याच्या आणि जागतिक पातळीवर कोव्हिडविरुद्ध लढ्याचे नेतृत्व केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुट्रेस यांनी भारताचे कौतुक केले आहे.संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेसाठी भारताने कोरोना प्रतिबंधक दोन लाख डोस पुरविले आहेत. त्याबद्दल गुट्रेस यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून आभार व्यक्त केले आहेत. त्यांचे पत्र भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी ट्वीट केले आहे. कोरोनाचा मुकाबला करण्याच्या लढ्यात भारत हा जागतिक नेता आहे.

भारताने कोव्हिड काळात सुमारे १५० देशांना औषधे, तपासणी साहित्य, व्हेंटिलेटर्स आणि पीपीई कीटचा पुरवठा केला आहे. कोरोना प्रतिबंधक दोन लसी भारताने विकसित केल्या आहेत आणि त्यांचे उत्पादनही केले आहे. या दोन्ही लसींना जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरयोग्य म्हटले आहे. त्याचा पुरवठाही जागतिक बाजारपेठेत सुरू आहे. अधिकाधिक देशांना लस मिळावी यासाठी संघटनेच्या कोव्हॅक्स मोहिमेलाही भारताने सातत्याने पाठिंबा दिला आहे, असे या पत्रात गुट्रेस यांनी नमूद केले आहे.

 

शंतनू मुळूक यांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या