25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयपश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ ते सकाळी १० सभांवर बंदी!

पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ ते सकाळी १० सभांवर बंदी!

एकमत ऑनलाईन

कोलकाता : देशात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र, दुसरीकडे पाच राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये कोरोनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: पश्चिम बंगामध्ये ८ टप्प्यांमध्ये होणा-या निवडणुकांसाठीच्या प्रचारामधून या नियमांचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सामान्य नागरिकांना नियमांचे बंधन असताना राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना हे नियम लागू नाहीत का? असा सवाल देखील उपस्थित केला जात होता. अखेर निवडणूक आयोगाने त्यावर कठोर पावले उचलली असून, पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ ते सकाळी १० या काळात प्रचारसभांना बंदी घालण्यात आली आहे.

काय आहेत नियम?
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार पश्चिम बंगालमध्ये १६ एप्रिलपासून निवडणूक संपेपर्यंत संध्याकाळी ७ ते दुस-या दिवशी सकाळी १० या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रॅली, जाहीर सभा, पथनाट्य, नुक्कड सभा करण्यावर बंदी असणार आहे. त्याशिवाय सहाव्या, सातव्या आणि आठव्या अर्थात शेवटच्या टप्प्यासाठी प्रत्येक टप्प्याच्या आधीचा शांतता काळ अर्थात ७२ तासांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मतदानाच्या आधी ७२ तास रॅली, जाहीर सभा, पथनाट्य, नुक्कड सभा, बाईक रॅली किंवा कोणत्याही प्रकारे प्रचारासाठी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

आयोगाने फटकारले!
निवडणूक आयोगाने आपल्या परिपत्रकामध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि आयोजकांना फटकारले आहे. प्रचारसभा आणि जाहीर प्रचारादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे आणि मास्कसंदर्भातले नियम जाहीरपणे पायदळी तुडवल्याचे दिसून आले आहे. आयोगाने घालून दिलेल्या नियमांची जाहीरपणे पायमल्ली झाली आहे, असे आयोगाने म्हटले आहे. त्याशिवाय, स्टार प्रचारक, राजकीय नेते किंवा उमेदवारांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे देखील आयोगाने नमूद केले आहे.

नांदेड जिल्ह्यात १ हजार ३५१ व्यक्ती कोरोना बाधित,२५ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या