23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयजो नफरत करे, वह योगी कैसा?

जो नफरत करे, वह योगी कैसा?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मंगळवार दि. १४ सप्टेंबर रोजी आपल्या ट्विटरवर टीका करत म्हटले आहे की, जो नफÞरत करे, वह योगी कैसा! या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी थेट योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांचे सरकार हे थेट मुस्लिम-दलित अल्पसंख्यांकाच्या मुळावर उठल्याचा आरोप विरोधकांचा आहे. मुख्यमंत्री थेटपणे मुस्लिम द्वेषाचं समर्थन करतात, अशी टीका विरोधकांची आहे. राहुल गांधींच्या या टीकेला योगींच्या अलिकडील एका वक्तव्याचा संदर्भ आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण सध्या गरम असून ते दिवसेंदिवस अधिक तापण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकीकडे राज्याचा विकास केला असल्याचा दावा छातीठोकपणे करुन लोकांना आपल्याबाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर विरोधक योगींच्या विकासकामातील त्रुटी लोकांसमोर आणत आहेत. अलिकडेच योगी आदित्यनाथ सरकारची एक जाहिरात वादग्रस्त ठरली आहे तर दुसरीकडे योगींचे अब्बाजान हे वक्तव्य चर्चेचे ठरले आहे. यासंदर्भातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

अब्बाजानवरून राजकारण
उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये बोलत असताना, योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी भाजप सरकारच्या काळात सर्वांना समान न्याय मिळतो हे सांगताना पुर्वी फक्त अब्बाजान म्हणणा-यांना रेशन मिळायचे असे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, २०१७ मध्ये मी सत्तेवर आल्यानंतरच उत्तर प्रदेशातील सार्वजनिक धान्यवितरण व्यवस्था परिणामकारक बनली. त्याआधी गरिबांसाठी राखून ठेवण्यात आलेले धान्य जे अब्बाजान म्हणायचे त्यांच्याकडून खाल्ले जायचे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या