36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयगादी परत मागितली तर काय कराल - टिकैत यांची गर्जना

गादी परत मागितली तर काय कराल – टिकैत यांची गर्जना

एकमत ऑनलाईन

जिंद : शेतकरी आंदोलकांची हरियाणातील जिंद येथे महापंचायत पार पडली. त्यात शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्रसरकारला इशाराच दिला आहे. सध्या केवळ कायदेच मागे घेण्याची मागणी करीत आहोत, जर गादीच (सत्ता) मागे घेण्याची मागणी केली तर काय कराल? असा सवालच त्यांनी सरकारला विचारला आहे. हरियाणातील जिंद येथे झालेल्या महापंचायतीत तिन्ही कृषि कायद्यांविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

जेव्हा-जेव्हा राजा घाबरतो, तेव्हा-तेव्हा तटबंदी तयार करत असतो. दिल्लीत खिळे ठोकले जात आहेत, ते आम्ही आमच्या शेतताही लावतो. आता आम्ही बिल वापस घेण्याची मागणी केली आहे, जर गादी परत करण्याची मागणी केली तर काय कराल? तसेच सध्या जिंद वासीयांना दिल्लीकडे कूच करण्याची आवश्यकता नाही. आपण येथेच थांबा, असे आवाहनही त्यांनी केले.

४० लाख ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरणार
आंदोलकांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. राज्यांमधील तसेच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन करणार आहेत. यादरम्यान राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने जर आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढू. एका राज्यातून दुस-या राज्यात आम्ही प्रवास करु. येथील आंदोलनदेखील सुरु राहणार. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही,असा इशारा दिला आहे.

आपचे ३ खासदार निलंबित; राज्यसभेत गोंधळ सभापतींनी केली कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या