29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयकारगिलपेक्षा मोठ्या युद्धावर लक्ष कधी देणार?

कारगिलपेक्षा मोठ्या युद्धावर लक्ष कधी देणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून १ हजार ५०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माजी लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाही निवडणूक प्रचारसभा, शेतकरी आंदोलन आणि इतर कार्यक्रमांवर टीका केली आहे.

तसेच सर्व राजकीय पक्ष व सरकारांना कठोर विचारणा केली आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांपेक्षाही अधिक नागरिक काल एका दिवसांत मरण पावले. मग या युद्धावर लक्ष केंद्रित केले आहे का? असा सवालच त्यांनी केला आहे. वेद प्रकाश मलिक यांनी रविवारी ट्विट केले आहे. देशात रोज कोरोनामुळे मृत्यू होणारी संख्या दोन महिने चाललेल्या कारगिल युद्धातील संख्येपेक्षा जास्त असल्याची टीका केली आहे.

आपल्या देशात सध्या युद्ध सुरु आहे. १३३८ भारतीयांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याआधी ११८२ जणांचा झाला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांपेक्षा ही संख्या अडीच पट जास्त आहे. देशाने या युद्धावर लक्ष केंद्रीत केले आहे का?, अशी विचारणा वेद प्रकाश मलिक यांनी केली आहे.

मलिक यांनी देशातील निवडणुक प्रचारसभा, शेतकरी आंदोलन,धार्मिक कार्यक़्रमांना होणा-या गर्दीचाही उल्लेख केला आहे. अशा कठीण प्रसंगी युद्ध जिंकण्यासाठी एकजुटीने सामोरे जाण्यासाठी देशाने जागे होण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर १३ धावांनी विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या