नवी दिल्ली – केंद्रातली मोदी सरकारवर चीन आणि कृषी कायद्यांवरून टीका करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपाचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी चीनसंदर्भात एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत मिश्रा यांनी राहुल गांधींना सवाल केला आहे. ह्लइतक्या चांगल्या दर्जाची नशा कुठे करतात, माहिती नाही? असं मिश्रा पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
काँग्रेसचं सरकार असतं, तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी शेती वाचवा रॅलीला संबोधित म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या विधानावरून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी टीका केली आहे. ह्लदहा दिवसांत कर्जमाफी, १५ मिनिटांत चीनला साफ करणार. मी त्या गुरूंना नमन करतो ज्यांनी राहुल गांधींना शिकवलं. मला एक समजत नाही की, इतक्या चांगल्या दर्जाची नशा हे कोठून आणतात? असं म्हणत मिश्रा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.