23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय शेतक-यांनी माल विकावा कुठे? - राहुल गांधी

शेतक-यांनी माल विकावा कुठे? – राहुल गांधी

एकमत ऑनलाईन

पाटणा : कृषी कायद्यांवरुन पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही आणलेल्या कायद्यांमुळे शेतकरी त्याचा शेतमाल देशात कुठेही जाऊन विकू शकतो. मला मोदींनी उत्तर द्यावे की शेतकरी विमानाने त्याचा शेतमाल विकण्यासाठी जाईल की रस्त्यावर शेतमाल विकेल? रस्त्यावर शेतमाल विकायचा असेल तर बिहारमध्ये रस्ते आहेत कुठे? असे प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंजाबमध्ये मोदींचे पुतळे पंजाबमध्ये जाळले गेले त्यावरुनही टीका केली होती. संपूर्ण पंजाबमध्ये नरेंद्र मोदी, अंबानी आणि अदानी यांचे पुतळे जाळले गेले कारण शेतकरी त्रस्त आहेत, असे त्यांनी म्हटले होते़ आता बिहारमध्ये झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा कृषी विधेयकांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

मोदी खोटे बोलतात. आधी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते़ आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथे येऊन २ कोटी रोजगार देण्याबद्दल भाष्य केले, तर लोक त्यांना हाकलून लावतील. आम्ही रोजगार देण्याची माहिती आहे. विकास करणे आम्हाला माहिती आहे. आमच्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे आणि ती मी स्वीकारतो. आम्हाला खोटे बोलणे माहिती नाही. याबाबत आमची मोदींशी स्पर्धाच नाही, असेही राहुल गांधी म्हणाले होते. आता शेतकरी कुठेही जाऊन त्याचा शेतमाल विकू शकतो, असे म्हणणा-या मोदींना राहुल गांधींनी सुनावले आहे.

दिल्लीत कोरोना संक्रमणाची तिसरी लाट – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या