19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयजेपी आंदोलनाच्या वेळी अमित शहा कुठे होते : नितीश कुमार

जेपी आंदोलनाच्या वेळी अमित शहा कुठे होते : नितीश कुमार

एकमत ऑनलाईन

पाटणा : सारण जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण यांच्या सीताब दियारा गावातील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जोरदार टीका केली आहे. जेपी आंदोलनाच्या वेळी अमित शहा कुठे होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विचारले की, तुम्हाला काय माहित,? तुम्ही किती वर्षांपासून राजकारणात आहात? नितीश कुमार पुढं म्हणाले की, गुजरातमध्ये शहांना २००२ पासून संधी मिळाली, तर जेपी आंदोलन १९७४ मध्ये झाले. हे लोक काहीतरी बोलत राहतात. शहा मोठ्या गैरसमजात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, जेपींचे नाव घेऊन राजकारणात प्रवेश करणाऱ्यांनी आतापर्यंत पाच वेळा युत्या बदलून जेपींच्या तत्त्वांना बगल दिली आहे. आज तेच काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्तेचा आनंद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बिहारमधील सारण जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण यांच्या सीताब दियारा या गावाला भेट दिली होती. समाजवादी नेत्यांच्या १२० व्या जयंती सोहळ्यात भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. वास्तविक या गावाचा निम्मा भाग बिहारमध्ये आणि निम्मा भाग उत्तर प्रदेशात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या