23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeराष्ट्रीयव्हाईट फंगस तयार करतोय ‘लंग बॉल’

व्हाईट फंगस तयार करतोय ‘लंग बॉल’

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनानंतर रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. म्युकरमायकोसिस शिवाय व्हाईट फंगस, यलो फंगस आणि क्रीम फंगसचा देखील समावेश आहे. काही तज्ज्ञांच्या मते व्हाईट फंगसदेखील धोकादायक आहे. या फंगसचा संसर्ग झाल्यास तो सर्व अवयवांवर परिणाम करू शकतो. त्याचबरोबर तो लंग बॉल तयार करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे़

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट फंगसला वैद्यकीय भाषेत कँडिडा असे म्हणतात. याचा संसर्ग झाल्यास फुफ्फुसांसोबतच रक्त वाहिन्यांवरही परिणाम होतो, हे याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. रुग्णाच्या रक्तात फंगसचा प्रवेश झाल्यावर त्यास कँडिडीमिया असे म्हणले जाते आणि येथूनच तो धोकादायक होण्यास सुरुवात होते. एस.एन. मेडिकल कॉलेजमधील डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. आरती अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कँडिडीमिया फुफ्फुसांपर्यंत पोहोचला तर त्याला लंग बॉल असे म्हणले जाते़

सीटी स्कॅनद्वारे होते निदान
सीटी स्कॅनद्वारे तपासणी केल्यानंतर हा फुफ्फुसांमध्ये गोल आकारात अस्तित्वात असल्याचे दिसते, त्यामुळे याला लंग बॉल असे म्हणतात. कोरोनामुळे जसा फुफ्फुसांवर प्रतिकूल परिणाम होतो, तसाच परिणाम व्हाईट फंगसमुळे होत असल्याने रुग्णाच्या जीवाला धोका संभवतो. डॉ. आरती अग्रवाल यांनी फंगस हे सर्वसाधारणपणे कमी प्रमाणात आढळतात. सुरुवातीलाच याबाबत निदान झाले तर फार नुकसान होत नाही पण जर उपचारांना उशीर झाला तर हे फंगस नुकसानदायी ठरू शकतात.

सर्व अवयवांवर दुष्परिणाम
त्वचा, नखे, तोंडातील आतील भाग, आतडी, किडनी, पित्ताशय तसेच मेंदुलाही तो विळखा घालू शकतो. त्यामुळे वेळीच याचा संसर्ग आटोक्यात आणला नाही तर अवयव निकामी होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. फुफ्फुसांची एचआरसीटी तपासणी केल्यास ज्या प्रमाणे ब्लॅक फंगस दिसतो तसाच व्हाईट फंगसही दिसून येतो.

कमकुवत रोगप्रतिकारशक्ती घातक
कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेले मधुमेही रुग्ण आणि दिर्घकाळ स्टेरॉईड घेत असलेल्या रुग्णांना याचा जास्त धोका असतो. त्यामुळे कोरोनामुळे दीर्घकाळ रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि स्टेरॉईड घेत असलेल्या रुग्णांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या फंगसचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या तोंडात दह्यासारख्या पांढ-या पदार्थासारखा थर दिसून येतो.

दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या