24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयWHO : पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालायची गरज नाही

WHO : पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालायची गरज नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे . त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) लहान मुलांबाबतची नियमावलीत सुधारणा केली आहे. WHO नुसार, पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालण्याची गरज नाही. कमीतकमी मदतीने मास्क घालण्याची मुलांची क्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

6 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी नियम काय?
  • WHO ने हा निर्णय घेताना इतरही अनेक गोष्टींचाही विचार केला, जसे की लहान मुलांची सुरक्षितता आणि आरोग्य. त्याशिवाय, 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांसाठी WHO ने वेगळे नियम बनवले आहेत. या वयोगटातील मुलं जर त्या क्षेत्रातून येत असतील जिथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तरच त्यांना मास्क घालण्याची गरज आहे.
  • यामध्ये मुलांच्या मास्क घालण्याची क्षमता, मोठ्यांची काळजी आणि मास्क घालण्याच्या संभाव्य प्रभावांबद्दल विचार करण्यात आला आहे.
  • 12 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी मास्क अनिवार्य
  • WHO नुसार, 12 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना मास्क घालणे अनिवार्य असेल आणि प्रौढांसाठी सध्या असलेल्या गाईडलाईन्सच लागू असतील.
  • कॅन्सर रुग्णांनी मेडिकल मास्क घालावे
  • कॅन्सर आणि सिस्टिक फायब्रोसिसने ग्रस्त असलेल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी मेडिकल मास्कचा करावा, असंही WHO ने सांगितलं. WHO नुसार, मास्क घालताना त्या मुलांना अडथळा येतो त्या मुलांना मास्क घालणे अनिवार्य नसेल.

जिल्ह्यात कंटेनमेंट झोन नावालाच,नागरिकांचा मुक्त संचार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या