22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलसीकरणासाठी डब्ल्यूएचओने भारताकडे मागितली मदत

लसीकरणासाठी डब्ल्यूएचओने भारताकडे मागितली मदत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जागतिक स्तरावरील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारताकडे आणि सीरम संस्थेकडे मदत मागितली आहे. ब-याच देशांमध्ये लसींच्या तुटवड्यामुळे लसीचा दुसरा डोस देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनी सीरमकडे मदत मागितली आहे. सीरम इंस्टीटयूट ही अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड लसीची जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे.

कोविशिल्ड लसीचा एक डोस दिल्यानंतर अनेक देशांमध्ये दुस-या डोसची कमतरता आहे. ही कमतरता तीस ते चाळीस देशांमध्ये आहे. यावर मात करण्यासाठी भारत सरकार आणि सीरम इंस्टीटयूटकडे ही लस देण्यासाठी मदत मागण्यात आली आहे. आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया या देशांमध्ये लसीची कमतरता आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) वरिष्ठ सल्लागार ब्रूस आइलवर्ड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारतातील कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर आम्हालाही सीरम इन्स्टिटयूटने लसींचा पुरवठा करण्याची गरज आहे कारण कोव्हॅक्सअंतर्गत त्यांचे वितरण करायचे आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रॉस गेब्रीएयसस यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते.

नेपाळ आणि श्रीलंकासारख्या देशांमध्ये कोरोनाच्या लाटा
भारताच्या शेजारील नेपाळ आणि श्रीलंकासारख्या देशांमध्ये कोरोनाच्या अनेक लाटा येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्स मोहिमेअंतर्गत अलिकडच्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर ८० दशलक्षांपेक्षा जास्त लसींचे डोस उपलब्ध केले आहेत. भारतात कोरोनाच्या दुसºया लाटेनंतर लसींचा तुटवडा जाणवत आहे. याआधी देखील भारतातर्फे जगातील बºयाच देशांना लस पुरविली गेली आहे.

कोरोना लसीच्या पुरवठ्याच्या मागणीला वेग
जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की लसींचा पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी भारत सरकार आणि अ‍ॅस्ट्राझेनेका-सीरम यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. आरोग्य संघटना त्वरित लसींचा तुटवडा असलेल्या देशांमध्ये करोना लसीची पुरवठा करण्यासाठी अ­ॅस्ट्रॅजेनेका, सीरम इन्स्टिटयूट आॅफ इंडिया (एसआयआय) व भारत सरकारबरोबर तातडीने काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

देशात चार सिंहांना डेल्टा व्हेरिअंटची लागण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या