27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयभाजपचे पाप जनतेने का भोगावे?

भाजपचे पाप जनतेने का भोगावे?

एकमत ऑनलाईन

कोलकाता : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सुरू झालेला वाद काही केल्या शांत होताना दिसत नाही. शर्मा यांच्या विधानाविरोधात काल देशभरातील विविध भागात आंदोलनं करण्यात आली. यादरम्यान काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याने येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील हावडा येथे काल उसळलेल्या हिंसाचाराची धग दुस-या दिवशीदेखील सुरूच असून, या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ममता म्हणाल्या की, हावडामध्ये हिंसक घटना घडत आहेत, त्यामागे काही राजकीय पक्षांचा हात असून, त्यांना दंगल घडवायची आहे, परंतु हे सहन केले जाणार नाही. राज्यातील वातावरण दूषित करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे सांगत त्यांनी भाजपच्या पापाची फळं जनता का भोगणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

पश्चिम बंगालमधील हावडा येथील पांचाला बाजार येथे शनिवारी सलग दुस-या दिवशी पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काही भागात १५ जूनपर्यंत कलम १४४ वाढवण्यात आले आहे.

सैन्य तैनात करण्याची मागणी
पश्चिम बंगालमधील शुक्रवारच्या हिंसाचारप्रकरणी हावडा पोलिसांनी काल रात्रीपासून आतापर्यंत ७०जणांना अटक केली आहे. दरम्यान, वाढत्या हिंसक घटनांनंतर भाजपचे खासदार आणि पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष सौमित्र खान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याची विनंती केली आहे. याबाबत त्यांनी शहा यांना पत्र लिहिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या