27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीयव्हॉटस्अ‍ॅपवरून पत्नीने घडविला २८ वेळा तुरुंगवास

व्हॉटस्अ‍ॅपवरून पत्नीने घडविला २८ वेळा तुरुंगवास

एकमत ऑनलाईन

धौलपूर : उत्तर प्रदेश सीमेवरील राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात पती-पत्नीसंबंधीत एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार पुढे आला आहे. येथे पतीला त्याच्या पत्नीला बॉयफ्रेंडसोबत मौज-मजा करण्यापासून थांबवणे अंगलट आले आहे. पतीच्या या टोकाटाकीमुळे पत्नीने त्याला आतापर्यंत तब्बल २८ वेळा तुरुंगात पाठवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रताडित पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी आई आणि मुलांनाही मारहाण करते. यासर्व गोष्टींना कंटाळून अखेर पतीने न्यायालयाचे दार ठोठावले आहे. न्यायालयाच्या माध्यमातून पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधात धौलपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

घर खर्चासाठी दिलेले पैसे जुगारात उडवायची
धौलपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विरेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने आपल्याच पत्नीविरोधात प्रताडना केल्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीचा आरोप आहे की त्याची पत्नी घर खर्चासाठी दिलेले पैसे जुगारात उडवते आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबत मौज-मस्ती करते. त्याने अनेकदा पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत बोलताना पकडले आहे. पतीच्या आरोपांनुसार, तो जेव्हाही तिला बॉफ्रेंडसोबत बोलण्यापासून रोखतो तेव्हा ती त्याची तक्रार पोलिसांत देऊन त्याला तुरुंगात पाठवायची. रिपोर्टनुसार, तक्रारदार पतीला त्याच्या पत्नीने तब्बल २८ वेळा तुरुंगात पाठवलं आहे. तसेच, तिने तरुणासोबत आणि आई, मुलांसोबत जबर मारहाण केल्याचाही आरोप आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.

महिला गटांकडून सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे कर्ज
इतकेच नाही तर या पत्नीने महिला गटांकडून सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे कर्ज देखील घेतले आहे. ते सर्व कर्ज पतीला फेडावे लागले. यानंतरही ती घर खर्चासाठी देण्यात आलेले पैसे जुगारात घालवायची, असाही आरोप आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत असून खरी वस्तूस्थिती पोलिस तपासाअंतीच पुढे येईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या