22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयबायको कुरूप; ठार मारण्याची दिली सुपारी

बायको कुरूप; ठार मारण्याची दिली सुपारी

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारच्या भोजपूरमध्ये पती-पत्नीवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा पोलिसांनी दोन दिवसांत उलगडा केला. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी जे सत्य सांगितले ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पत्नीच्या हत्येचा कट पतीनेच रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पतीने सांगितले की, माझी बायको सुंदर नाहीय, त्यामुळे तिच्या हत्येचा कट रचला गेला. गजराजगंज पोलिस स्टेशन हद्दीतील पकडियाबार गावात पती-पत्नीवर गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिस पथकाने कसून तपास व मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन गुन्हेगारांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १ देशी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत काडतुसे, मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या