22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयभाजप टीडीपीसोबत युती करणार?

भाजप टीडीपीसोबत युती करणार?

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : तेलंगणात स्वतःला बळकट करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भारतीय जनता पक्ष आता तेलुगू देसम पार्टी सोबत युती करू शकतो. चंद्रशेखर राव यांना सत्तेवर येण्यापासून रोखणं हा यामागचा हेतू आहे, जी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी आघाडी आहे.

टीडीपी लवकरच भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. केसीआर राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत असताना भाजपनं तेलंगणात आपली पूर्ण ताकद लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तेलंगणातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतल्यानं आणि हैदराबादमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्यानं भाजप तेलंगणात आपली ताकद दाखवताना दिसत आहे. केसीआरशी स्पर्धा करा, असं आवाहन पक्षाकडून करण्यात आलंय. मात्र, तेलंगणाच्या राजकारणात टीडीपी फार काळ मोठा पक्ष राहणार नाहीय. आंध्र आणि रायलसीमा भागात राहणाऱ्या लोकांचा पक्षाला चांगला पाठिंबा मिळत असून भाजपनं युतीचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

आपल्या ‘मिशन २०२३’ अंतर्गत भाजप एकूण ११९ पैकी सुमारे ३२ विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करत आहे. अभिनेते पवन कल्याणच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्ष (जेएसपी) भाजपला जास्तीत-जास्त जागा मिळवून देऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघ हैदराबाद आणि आसपासचे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या