21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयनिवडणूक स्वबळावरच लढवणार; अखिलेश यादव यांचा निर्णय

निवडणूक स्वबळावरच लढवणार; अखिलेश यादव यांचा निर्णय

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशात विरोधक भाजपाविरोधात आघाडी करण्याची चर्चा सुरू असतानाच समाजवादी पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आघाडी करण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस कुमकुवत असल्याचे सांगत स्वतंत्र निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. मागील काही आठवड्यांपासून भाजपा नेत्यांच्या उत्तर प्रदेशात हालचाली वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपाकडून जोरात मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.

उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अखिलेश यादव यांनी ही भूमिका मांडली. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले, योगी आदित्यनाथ यांच्यामुळे उत्तर प्रदेशचा विकास खुंटला असून, त्यांनी भ्रष्टाचार आणि दमन करण्याला प्रोत्साहन दिले आहे. लोकांना आता बदल हवा आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव अटळ आहे, असा दावा त्यांनी केला.

मोठ्या पक्षांसोबत अनुभव चांगला नाही
मोठ्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा माझा अनुभव चांगला नाही. आता मी त्यांच्यासोबत आघाडी करण्याच्या भानगडीत पडणार नाही, असे म्हणत अखिलेश यादव यांनी अप्रत्यक्षपणे मायावती यांची बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेससोबत आघाडी करण्यार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. भाजपाचा पराभव करण्याची ज्यांची इच्छा आहे. मी त्यांना आवाहन करेन की, त्यांनी समाजवादी पार्टीला पाठिंबा द्यावा, असेही अखिलेश यादव म्हणाले.

रामदेव बाबांची सर्वोच्च धाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या