26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयअंतराळ क्षेत्रात खाजगी भागीदारी वाढविणार

अंतराळ क्षेत्रात खाजगी भागीदारी वाढविणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या कंपन्यांची विक्री आणि चलनीकरण प्रक्रिया जोरात सुरू असताना आता केंद्रातील मोदी सरकार अनेकविध क्षेत्रात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. आता देशाचा अभिमान असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये खाजगी भागीदारी वाढविण्यावर विचार सुरू आहे. यासाठी सध्याच्या धोरणात बदल करून उद्योगावर आधारित नवे धोरण स्वीकारले जाणार आहे, असे इस्रोचे सचिव डॉ. के. सिवन म्हणाले.

दुबई एक्स्पो २००० च्या एका कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झालेले डॉ. सिवन बोलत होते. अंतराळ क्षेत्रात खाजगी भागीदारी वाढविण्यासाठी काही धोरणांमध्ये बदल करीत उद्योग आधारित योजना आणणार असल्याची माहिती इस्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांनी दिली. भारतीय अंतराळ क्षेत्रात खाजगी भागीदारी वाढविण्यासाठी वर्तमान धोरणात महत्त्वाचा बदल केला जात आहे. तसेच यात दुरुस्ती करून नवीन धोरण, योजना आखल्या जातील. उद्योग आधारित धोरणे तयार करण्यावर भर असून, यावर काम सुरू असल्याची माहिती के. सिवन यांनी दिली. ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आगामी काळात जागतिक पातळीवर अंतराळ उद्योगात भारतीय कंपन्यांना फार महत्त्वाची भूमिका निभावावी लागणार आहे.

आगामी काळात भारतीय कंपन्यांची अंतराळ क्षेत्रात महत्त्वाची भूमिका राहणार असून, त्यासाठी धोरणात बदल केला जात आहे. या सुधारणांनंतर खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना अंतराळ क्षेत्रातील अनेक प्रक्रियांमध्ये सहभागी होता येईल. तशी संधी उपलब्ध झाल्याने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल, असे के. सिवन यांनी म्हटले आहे. वाणिज्य आणि तंत्रज्ञान सहयोगातून अंतराळ क्षेत्र आणखी मजबूत होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करीत जागतिक स्तरावर अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच भारताला एक आर्थिक अंतराळ केंद्र बनविण्यासाठी भारतीय अंतराळ असोसिएशन नामक योजना लॉंच करण्यात आल्याचेही सिवन म्हणाले.

अंतराळ क्षेत्रात खाजगी भागीदारी वाढविल्यास वाणिज्यिक आणि तंत्रज्ञानाच्या सहयोगातून आणखी मोठी भरारी घेणे शक्य आहे. सरकार अंतराळ क्षेत्रातील खाजगी कंपन्यांना निमंत्रण देण्यास तयार आहे आणि इस्रो स्टार्ट अप आणि उद्योगासोबत हातमिळवणी करणार आहे. इस्रोने स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोग आणि उद्योग तथा आंतरिक व्यापार संवर्धन विभागासोबत (डीपीआयआयटी) करार केला आहे. सिवन यांनी यावेळी बाहेरील अंतराळ सुरक्षा अधिक मजबूत करण्यावर जोर दिला आणि यासाठी सरकारी आणि बिगर सरकारी एजन्सीची प्रमुख जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन
भारत सरकार जागतिक बाजारपेठेत अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी योजना आखली जात आहे. भविष्यात एक आर्थिक अंतराळ केंद्र स्थापित करण्यासाठी इंडियन स्पेस असोसिएशनचे लॉंचिंग केले आहे. या माध्यमातून जागतिक स्तरावर अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे डॉ. सिवन म्हणाले. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्राला गती देण्यासाठी मोठा वाव मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इस्रोची स्टार्ट अपशी भागीदारी
अंतराळ क्षेत्रात खाजगी कंपन्यांना आमंत्रित करण्यासाठी इस्रो तयार असून, स्टार्ट अप कंपन्यांची भागीदारी करण्यावर काम सुरू आहे. भारत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागीदारीसह आंतरराष्ट्र सहयोगावरही लक्ष केंद्रीत करीत असल्याचे के. सिवन यांनी सांगितले. तसेच अंतराळ सुरक्षित ठेवण्याच्या आवश्यकतांवर भर दिला जात असून, ती सरकारी आणि खाजगी संस्थांची जबाबदारी असल्याचे सिवन यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या