23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयश्रीलंकाप्रश्नी भारत करणार हस्तक्षेप?

श्रीलंकाप्रश्नी भारत करणार हस्तक्षेप?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी श्रीलंकेच्या संकटावर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि एस जयशंकर तेथील परिस्थितीची माहिती देतील. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. तमिळनाडूच्या राजकीय नेत्यांमनी या संकटाच्या वेळी श्रीलंकेला साथ देण्याचे आवाहन भारत सरकारला केले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत तामिळनाडू पक्ष डीएमके आणि एआयएडीएमके यांनी अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्या कारभारात भारताने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. रविवारच्या बैठकीत वरील दोन्ही पक्षांनी श्रीलंकेतील परिस्थिती आणि विशेषत: त्या देशातील तमिळ लोकसंख्येशी संबंधित मुद्दा उपस्थित केला. द्रमुक नेते एम थंबीदुराई यांनी बैठकीनंतर श्रीलंकेतील संकट सोडवण्यासाठी भारताने हस्तक्षेप केला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

डीएमकेने केली हस्तक्षेपाची मागणी
डीएमके नेते टीआर बालू यांनीही श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती सोडवण्यासाठी भारताच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. श्रीलंकेला गेल्या सात दशकांतील सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, परकीय चलनाच्या मर्यादांमुळे अन्न, इंधन आणि औषधे यासह जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीत अडथळे येत आहेत. सरकारविरोधात उग्र निदर्शनांनंतर आलेल्या आर्थिक संकटाने आता देशात राजकीय संकट देखील निर्माण केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या