33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय माफी मागणार नाही

माफी मागणार नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : मी केलेले ट्विट सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत असल्याचे आढळले आहे. मी जे ट्विट केले होते ते माझे सर्वोच्च सुप्रीम कोर्टाने प्राइम टाइम लाऊडस्पीकरविरोधात दिलेल्या एकतर्फी निर्णयावरील मत होते, असे कुणाल कामराने म्हटले आहे. कुणाल कामराने यावेळी माफी मागण्यास नकार दिला असून, माझे मत अद्यापही तेच असून, इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने बाळगलेले मौन टीका न करता दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केलेल्या ट्विटमुळे स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत आला असून, अवमान खटला दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अ­ॅटर्नी जनरल के़ के़ वेणुगोपाळ यांनी मान्यता दिली आहे. यानंतर कुणाल कामरा याने ट्विट करत आपली बाजू मांडली असून, पुन्हा एकदा उपहासात्मकपणे टीका केली आहे. त्याने ट्विटरला एक पोस्ट शेअर केली असून, ना वकील, ना माफी, ना दंड अशी कॅप्शन दिली आहे.

कुणाल कामराने यावेळी आपल्यावरील खटल्याचा वेळ माझ्याइतके महत्त्व आणि संधी न मिळालेल्या इतर महत्वाच्या प्रकरणांना द्यावा असेही म्हटले आहे. यावेळी त्याने काही प्रकरणांचा उल्लेखही केला आहे. माझी वेळ इतर महत्त्वाच्या मुद्यांना दिली तर आभाळ कोसळेल का?, असेही कुणाल कामराने विचारले आहे.

राहुल गांधी धडपड करणारे पण क्षमता आणि गुणवत्तेचा अभाव: बराक ओबामा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या