कोलकाता : सन २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्ष कुणासोबतही जाणार नाही. कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी राहिला आहे. त्यापूर्वी सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रणित युपीए आणि भाजप प्रणित एनडीए यांनी आपली तयारी सुरु केली आहे. त्याशिवाय देशातील काही महत्वाच्या नेत्यांनी तिस-या आघाडीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला रंग आला आहे.