27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयआपण निवृत्त होणार नाही

आपण निवृत्त होणार नाही

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नितीश कुमार गुरूवारी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले. नितीश कुमार यांनी जदयूच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितीश कुमार यांनी जनतेने एनडीएला बहुमत दिले असून, सरकार स्थापन केले जाईल, अशी माहिती दिली.

नितीश कुमार यांनी यावेळी आपण मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नसून एनडीए निर्णय घेईल असे म्हटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी समोर येत आपल्या अखेरची निवडणूक, या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. तसेच, आपण निवृत्ती घेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सप्ष्ट केले. मी निवृत्तीबद्दल वक्तव्य केले नव्हते. मी आपल्या प्रत्येक निवडणुकीच्या अखेरच्या रॅलीत कायम एक गोष्ट सांगत असतो. शेवट चांगला तर सर्वकाही चांगले.

तुम्ही माझे भाषण ऐकाल तर तुम्हाला त्याची कल्पना येईल, असे नितीश कुमार म्हणाले. भविष्यात आपण निवृत्त होणार नसून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यापूर्वी पूर्णियामध्ये जदयूच्या एका उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत नितीश कुमार यांनी संबोधित केले होते़ निवडणुकीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणूक संपणार आहे आणि ही माझी अखेरची निवडणूक आहे. शेवट चांगला तर सर्वकाही चांगले, असे नितीश कुमार त्यावेळी म्हणाले होते.

एनडीए सरकार स्थापन करणार
शपथग्रहण दिवाळीनंतर की छठनंतर करायचा याबद्दल अद्याप ठरलेले नाही. उद्या एनडीएची बैठक होणार असून, तिथे निर्णय घेतला जाईल. जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे. एनडीए सरकार स्थापन करणार, असे नितीश कुमार म्हणाले होते.

पंतप्रधान आज दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित करणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या