31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबईतून बॉलिवूड नेणार नाही

मुंबईतून बॉलिवूड नेणार नाही

योगी आदित्यनाथ ; नवी फिल्मसिटी उत्तरप्रदेशमध्ये उभारणार

एकमत ऑनलाईन

मुंबई: मुंबईतून बॉलिवूड नेण्यासाठी आलो नसून आम्हाला उत्तरप्रदेशमध्ये नवी फिल्मसिटी तयार करायची आहे. त्याच्या तयारीसाठी संबंधितांबरोबर चर्चा करण्यासाठी आलो आहे, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. उत्तर प्रदेश येथे होणा-या फिल्म सिटीवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणी भाजपवर टीका केली असून बॉलिवूडला मुंबईबाहेर नेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने या मुद्द्यावरुन आज योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निदशनेही केली. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत भुमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेशमध्ये जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभारण्याची आमची योजना आहे. यासाठी आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चाही केली आहे. ते सुद्धा या फिल्मसिटीसाठी उत्सुक आहेत.,असे आदित्यनाथ यांनी सांगितले.

बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला नेण्याबाबत विचारल्यावर आम्ही इथे काहीही घेऊन जायला आलेलो नाही. आम्ही नवीन तयार करण्यासाठी आलोय. ही खुली स्पर्धा आहे. मुंबई फिल्मसिटी आपले काम करेल, असे त्यांनी सांगितले.

आघाडीचा ‘बाजीगर’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या