28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयमाजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही- राजनाथ सिंह

माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही- राजनाथ सिंह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नौदलातील माजी अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवरील अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील एक कथित व्यंगचित्र शेअर केल्याबद्दल माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली. यावरून शिवसेनेवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

अमित शाहांना श्वसनाचा त्रास, एम्समध्ये उपचारासाठी दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या