राहुल गांधींची मुरूगा मठाला भेट
चित्रदुर्ग : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील श्री मुरूगा मठाला भेट दिली. त्यामुळे लिंगायत समाजासाठी राजकीय समीकरणे बदलणार का? याकडे लक्ष लागलेले आहे. राहुल गांधी यांनी भेट दिलेला मुरूगा मठ हा लिंगायत समाजासाठी मोठे श्रद्धास्थान मानले जाते. म्हणून राजकीय वर्तुळात बदल होऊ शकतात.
कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे सरकार सत्तेत असून काँग्रेस आपला मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरू असताना राहुल गांधी यांनी या मठाला भेट दिली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या कर्नाटक दौ-यावर असून येणा-या विधान सभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बांधणी आणि वाढीसाठी राहुल गांधी प्रयत्न करणार असून या दौ-यातील मुरूगा मठाला दिलेली भेट कर्नाटकमध्ये राजकीय बदल घडवणार का? याकडे लक्ष लागलेले आहे.