24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयलवकरच कोविशिल्डच्या वापराबाबत अर्ज करणार :आदर पुनावाला

लवकरच कोविशिल्डच्या वापराबाबत अर्ज करणार :आदर पुनावाला

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानंतर वितरण ; सर्वप्रथम भारतात लसीकरण

एकमत ऑनलाईन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सिरम इंस्टीट्युटला भेट दिल्यानंतर काही काळातच सीरम ट्यूट इंस्टीट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेतली असून येत्या दोन आठवड्यातच कोवीशिल्ड लसीच्या आपात्कालीन वापरासाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोना लस उत्पादनात काम करीत असलेल्या अहमदाबादच्या झायडस कॅडिला, हैद्राबादच्या भारत बायोटेक व पुण्याच्या सीरम इंस्टीट्युटला भेट दिली. भेटीत लसीच्या प्रगतीबद्दल तिन्ही कंपन्यांमधील तज्ज्ञांशी चर्चा केली,तसेच काही सूचनाही केल्या. शनिवारी संध्याकाळी पुण्यातील सीरम इंस्टीट्युटला त्यांनी भेट दिली होती. भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करीत तिन्ही कंपन्यांमधील लसनिर्मितीची प्रक्रिया उत्तम गतीने प्रगतीपथावर असल्याचे सांगितले होते.

लसीबाबत सर्वंकष चर्चा
सीरम पुनावाला यांनी कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सखोल चर्चा झाली. सध्या लस चाचणीच्या तिस-या टप्प्यात असून आमचे लक्ष त्याच्या निकालाकडे लागले आहे, असे सांगितले. लसीच्या साठवणुकीसाठी आपल्याकडे पुरेशी साठवणूक क्षमता व सक्षम व्यवस्था असल्याचेही सांगितले. संपुर्ण भारतात या लसीचे किती डोस लागणार याबाबत भारत सरकारने काहीही सांगितले नसले तरी सीरमने जुलै २१ पर्यंत ३० ते ४० कोटी लसींचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवल्याचेही सांगितले.

लसींच्या वितरणाबाबत केंद्रिय आरोग्य मंत्रालय निर्णय घेणार असून त्याबाबत निर्णय झाल्यानंतर सर्वप्रथम भारतात लसीचे वितरण होईल व त्यानंतर कोव्हॅक्स देशात वितरण केले जाईल. सीरमकडून आफ्रिका खंडातील देशात वितरण होणार असून ब्रिटनसह युरोप खंडात लसीच्या वितरणाची जबाबदारी अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड यांच्यावर आहे, असेही पुनावाला यांनी सांगितले.

लवकरच लसीकरण सुरु होणार का?
पंतप्रधानांच्या भेटीनंतर सीरम इंस्टीट्युटच्या सीईओंनी त्वरित पत्रकार परिषद घेऊन लसीच्या आपात्कालिन वापराबाबत दोन आठवड्यात अर्ज करणार असल्याचे सांगितले. तसेच लसनिर्मितीनंतर सर्वप्रथम तिचे वितरण भारतातच करणार असल्याचेही सांगितले. पुनावाला यांच्या या माहितीनंतर लवकरच कोरोना लसीचे लसीकरण सुरु होणार का ? अशी शंका व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपुर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना कोरोना लस दिल्यानंतर होणा-या दुष्परिणामांबाबत आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यावरुन लसीकरणाचा कार्यक्रम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

सीबीआयकडून चार राज्यात कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या