21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयगहलोत-पायलट वाद मिटणार?

गहलोत-पायलट वाद मिटणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अनेक मतभेदांनंतर पंजाबमधील कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यात काँग्रेसच्या हायकमांडने यश मिळवले आहेत. त्यानंतर आता गेल्या वर्ष दीड वर्षापासून राजस्थान काँग्रेसमध्ये धुमसत असलेला वाद मिटवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने निर्णायक पाऊल उचलण्याची तयारी केली आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा वाद सुरू आहे. मात्र हायकमांडने मनावर घेतल्याने आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा पक्षश्रेष्ठींचा कुठलाही विचार नाही. म्हणजेच अशोक गहलोत हे मु्ख्यमंत्रिपदी कायम राहतील.

सचिन पायलट राष्ट्रीय सरचिटणीसपदी?
एआयसीसीच्या संघटनेत बदल होतील. त्याच प्रक्रियेंतर्गत सचिन पायलट यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवले जाऊ शकते. तसेच त्यांच्याकडे राजस्थानचा प्रभार दिला जाऊ शकतो. याशिवाय राजस्थानमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यामध्ये सचिन पायलट यांच्या मर्जीतील आमदारांना मंत्रिपद मिळू शकते. मात्र सचिन पायलट यांचे किती समर्थक मंत्री बनणार हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.

पायलट समर्थकांना योग्य प्रतिनिधीत्व
सचिन पायलट यांच्या समर्थकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल. पक्षाच्या हायकमांडचे मत आहे की, बोर्ड आणि महापालिकांमध्ये पायलट आणि गहलोत गटांना महत्त्व देण्याऐवजी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना यामध्ये स्थान दिले पाहिजे. सध्या या बदलासह पक्षाला एकजूट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

प्रशांत किशोर यांना बोलावणार?
राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी पंजाबमध्ये कॅप्टन आणि सिद्धू यांच्यात झालेला वाद मिटवण्यात काँग्रेस हायकमांडची खूप मदत केली होती. प्रशांत किशोर हे आधीपासूनच कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करत आहेत. आता राजस्थानमधील अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादामध्येसुद्धा ते काही तोडगा काढू शकतात. यामुळे किशोर यांना पुन्हा बोलावण्यात येणार आहे़

१५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ला?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या