नवी दिल्ली : भाजपने राज्यसभेसाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना तिकीट दिले नाही. या परिस्थितीत केवळ नक्वीच नव्हे तर अल्पसंख्याक मंत्रालयाचेही भवितव्य धूसर असल्याची माहिती मिळाली आहे.
२००६ मध्ये मनमोहनसिंग सरकारच्या काळात जन्माला आलेले हे अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय आता प्रासंगिक उरले आहे का, असा सूर उमटू लागला आहे. नक्वी व त्यांच्यापूर्वी नजमा हेपतुल्ला यांनी या मंत्रालयाचा कारभार सांभाळला.