26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयमार्चपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल?

मार्चपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर ओसरत असताना पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन पडतेय की काय, अशी भीती सर्व स्तरातून व्यक्ती केली जात आहे. अशा परिस्थितीत जगाच्या तुलनेत भारतातील कोरोनाचा प्रसार कमीच होत आहे. लसीकरण मोहिमेमुळे हा प्रसार आटोक्यात आला आहे. यांसदर्भात तज्ज्ञांनी दिलासादायक मत व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या कोरोनाचा आलेख वाढत असला तरी मार्च अखेरपर्यंत हा कोरोनाची संख्या कमी होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कोरोना रुग्णांची संख्या ही मार्च अखेरपर्यंत कमी होईल, असा दावा राजीव करंदीकर (चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट), डॉ. शेखर मांडे (सीएसआयआर मुख्यालय), प्रा. एम. विद्यासागर (आयआयटी, हैदराबाद) या तज्ज्ञांनी एका लेखात केला आहे. द केस रॅपिड व्हॅक्सिनेशन आॅफ इंडिया अ‍ॅण्ड रेस्ट आॅफ द वर्ल्ड’ असा या लेखाचा मथळा आहे. अधिक माहितीकरीता हे तीनही लेखक केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या नॅशनल सुपर मॉडेल समितीचे सदस्य आहेत. देशात कोरोनाचा पहिला टप्पा नुकताच येऊन गेला आहे. दुसरा टप्पा अजून यायचा आहे. त्यामुळे पुन्हा देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी.

 

१५ वर्षांच्या मुलाने बनविले व्हॉटस्अ‍ॅपच्या तोडीचे अ‍ॅप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या