21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयपालेभाज्यांचे दर नियंत्रणात येणार?

पालेभाज्यांचे दर नियंत्रणात येणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात टोमॅटो आणि कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचे चांगले परिणाम सध्या दिसून येत आहेत. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने हा दावा केला आहे. गेल्या महिनाभरात टोमॅटोच्या किमती २९ टक्क्यांनी खाली आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत मागील महिन्याच्या तुलनेत २९ टक्क्यांनी कमी झाली आहे. बाजारातील आवक सुधारल्याने टोमॅटोच्या सरासरी भावात घट झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, मान्सूनच्या पावसामुळे भाजी मंडईमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे.

त्यामुळे दरात दिलासा मिळाला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो ३७.३५ रुपये होती, जी एका महिन्यापूर्वी ५२.५ रुपये प्रति किलो होती. त्याच वेळी, सरकारी आकडेवारीनुसार, मंगळवारी कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत २५.७८ रुपये प्रति किलो होती.

कांद्यांची किंमत ९ टक्क्याने घसरली
मंत्रालयाने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, बाजारातील कांद्याच्या किरकोळ किंमतीही गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. कांदा आणि टोमॅटो या भारतीय स्वयंपाकघरात वापरल्या जार्णा­या दोन महत्त्वाच्या भाज्या आहेत.

कांद्यांचा बफर स्टॉक
सरकार कांद्याची साठवणूक करून बफर स्टॉक तयार करते. केंद्र सरकारने चालू वर्षात २.५० लाख टन कांद्याचा साठा तयार केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक खरेदी केलेला कांद्याचा बफर स्टॉक आहे. या निर्णयामुळे ३१७.०३ लाख टन कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी, यंदा मंडईत भाव कोसळलेले नाहीत, असा सरकारचा विश्वास आहे. मंत्रालयाकडून असेही सांगण्यात आले आहे की, यावर्षी कांद्याचा हा बफर स्टॉक ऑगस्ट ते डिसेंबर या काळात बाजारात कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी वापरला जाईल. दरवर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशातील मंडईंमध्ये कांद्याच्या दरात वेगवेगळ्या कारणांमुळे वाढ होत असते.

बफर स्टॉक होणार खुल्या बाजारात वितरण
ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितले आहे की, कांद्याचा बफर स्टॉक खुल्या बाजारात विक्रीद्वारे पाठवला जाईल. ते राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि सरकारी संस्थांना किरकोळ दुकानांमध्ये पुरवठ्यासाठी दिले जाईल. सरकारने म्हटले आहे की, कांद्याचा बफर स्टॉक देशातील काही बाजारपेठांमध्ये वापरला जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या