21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयराजस्थान काँग्रेसमधील कलह निवळणार?

राजस्थान काँग्रेसमधील कलह निवळणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपुष्टात आल्यानंतर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपला मोर्चा राजस्थानकडे वळवला असून, मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर पडदा टाकण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न सुरु केले आहेत. पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यानंतर राजस्थानमधील पायलट गटाच्या आशा वाढल्या आहेत. काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाळ आणि राजस्थान प्रभारी अजय माकन यांच्या उपस्थितीत २८ जुलैला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़

जयपूरमध्ये होणाºया बैठकीत आमदारांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यासाठी के़ सी़ वेणुगोपाळ आणि अजय माकन यांनी काँग्रेस आमदारांशी चर्चा केली. दरम्यान राजस्थानमध्ये २८ जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी के सी वेणुगोपाळ आणि अजय माकन यांनी चर्चा केली. ही चर्चा जवळपास अडीच तास चालली. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय सोनिया गांधींवर सोडल्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले. त्यामुळे सोनिया गांधी लवकरच निर्णय घेतील असे बोलले जात आहे.

काँग्रेसचे देशात विविध ठिकाणी बदल
पायलट गटातील आमदार मुकेश भाकर आणि रामनिवास गावरिया यांनी राजस्थानमध्ये लवकरच न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. काँग्रेस देशात बदल करत आहे. त्यामुळे आशा आहे की, इथेही न्याय मिळेल. राजस्थान गेल्या काही दिवसांपासून वाट बघत आहे. आता ते पूर्ण होईल असे दिसत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसश्रेष्ठींचे म्हणणे ऐकणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आशा आहे की, राजस्थानात सर्व काही ठिक होईल. असे मुकेश भाकर आणि रामनिवास गावरिया यांनी सांगितले.

शेतक-यांच्या प्रसंगावधानाने टळला मोठा रेल्वे अपघात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या