30.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home आंतरराष्ट्रीय अमेरिका निवडणुकीपूर्वीच भारत-अमेरिका संरक्षण करार होणार?

अमेरिका निवडणुकीपूर्वीच भारत-अमेरिका संरक्षण करार होणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर ‘टू प्लस टू’ मंत्रीस्तरीय चर्चेसाठी सोमवारी भारतात दाखल होत आहेत. भारत चीन तणाव तसेच अमेरिकेत होणा-या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या एका आठवड्यापुर्वी चर्चेची ही तिसरी फेरी पार पडत आहे. मंगळवारी ही ‘टू प्लस टू’ चर्चा होणार आहे. चर्चेत भारताकडून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. एक अग्रगण्य स्थानिक आणि जागतिक ताकद म्हणून नव्याने ओळखल्या जाणाºया भारताचे स्वागत करत आहोत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या पुढच्या कार्यकाळात आपल्या दृढ सहयोगाबद्दल अमेरिका आशावादी आहे, असे अमेरिकन परराष्ट्र विभागाकडून अधिकृतरित्या म्हटले गेले आहे.

‘माझा भारत, श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशियाचा प्रवास सुरू झाला आहे. स्वतंत्र, बळकट आणि संपन्न राष्ट्रांनी बनवलेल्या मुक्त आणि खुल्या भारत पॅसिफिक क्षेत्राबद्दल सामायिक दृष्टिकोनासाठी आमच्या सहकाºयांबरोबर जोडला जाण्याचा योग भाग्यदायक आहे, ’असे माईक पोम्पिओ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भारत आणि चीन तणावादरम्यान ही भेट होत असून त्यादृष्टिकोनातूनही ही चर्चा महत्त्वपुर्ण आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्कटी एस्पर दिल्लीत होणा-या संमेलनात सहभागी होण्यासाठी भारताकडे रवाना झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीनंतर आठ महिन्यांनंतर ही चर्चा होत आहे.

मुफ्तींच्या विरोधात तिरंगा रॅलीचे आयोजन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या