37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीय...तिच्यासोबत लग्न करणार का?

…तिच्यासोबत लग्न करणार का?

सर्वाेच्च न्यायालयाचा आरोपीला सवाल; शाळकरी मुलीवरील बलात्कार प्रकरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एका सरकारी कर्मचाºयाने बलात्काराच्या आरोपाखाली होणारी अटक रोखण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने त्याला तंबी दिली. आपली सरकारी नोकरी जाईल, अशी भीती तुला अपराध करताना का वाटली नाही? तुला शिक्षा होऊ नये, असे वाटत असल्यास तू तिच्याशी लग्न करणार का? अशी विचारणा केली.

महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनीमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करणा-या मोहित सुभाष चव्हाण याने काही वर्षांपुर्वी एका शाळकरी मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी त्याला तुरुंगवास घडल्यास आपली सरकारी नोकरी जाईल व आपले कुटूंब उघड्यावर पडेल, त्यामुळे तुरुंगवास होऊ नये अशी मागणी करणारी याचिका त्याने सर्वाेच्च न्यायालयात केली होती. त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर सुनावणी झाली. शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्याने आपण आपली सरकारी नोकरी गमावू शकतो असे न्यायालयात सांगितले. त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्याला विचारले की, ‘‘जर तू लग्न करणार असशील तर आम्ही मदत करु शकतो. जर नाही, तर तुझी नोकरी जाईल आणि तुला जेलमध्ये जावे लागेल. मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी याचा विचार करायला हवा होता. यावर आरोपीच्या वकिलाने यासंबंधी सूचना घेऊ असे उत्तर दिले. त्यावर सरन्यायाधीशांनी याचा विचार मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी व्हायला हवा होता, अशी समज त्याला दिली.

आम्ही तुला लग्नासाठी जबरदस्ती करत नाही आहोत. पण जर करण्याची तयारी असेल तर आम्हाला कळव. नाही तर आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करत आहोत असे सांगशील, असे सरन्यायाधीशांनी त्याला सुनावले.आरोपीनेही आपली भुमिका मांडली. मला आधी लग्न करण्याची इच्छा होती. पण तिने नकार दिला. आता मी विवाहित असल्याने लग्न करु शकत नाही,असे सांगितले. याशिवाय खटला सुरु असून अद्यापही आरोप सिद्ध झाले नसल्याचेही त्याने सांगितले. मी सरकारी कर्मचारी असून जर अटक झाली तर आपोआप निलंबित होईन, असे त्याने न्यायालयाला सांगितले.

त्यावर सरन्यायाधीशांनी म्हणूनच आम्ही तुला हा पर्याय दिला आहे. आम्ही चार आठवड्यांसाठी अटक स्थगित करत आहोत. नंतर तू नियमित जामीनासाठी अर्ज करु शकतोस,असे आरोपीला सांगितले. संबंधित आरोपीला ट्रायल कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिले होते , पण उच्च न्यायालयाने फेटाळले होते.

आता मिळणार २५० रूपयात कोरोना लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या