25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय लवकरच कुठूनही मतदान करण्याचा हक्क मिळणार?

लवकरच कुठूनही मतदान करण्याचा हक्क मिळणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोणत्याही मतदानकेंद्रावरुन कोणत्याही मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी भारतीय निवडणुक आयोग प्रयत्न करीत असल्याची माहिती मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली आहे. त्यासाठी एका प्रकल्पावर काम सुरु असून त्याची चाचणीही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला सुनील अरोरा यांनी भविष्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा दृष्टिकोन देशवासियांसमोर ठेवला. देशातील कोणत्याही मतदानकेंद्रावर जाऊन मतदाराला आपले मत नोंदवता येण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाचे काम सुरु आहे. किंबहुना त्याची चाचणी सुरु असल्याचे अरोरा यांनी सांगितले. आम्ही आयआयटी-मद्रास आणि इतर संस्थांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रिमोट वोटिंग संशोधन प्रकल्प सुरु केला आहे. आमचा हा प्रकल्प प्रगतीपथावर असून त्याची चाचणीही सुरु झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.

लाखो मतदारांना होणार लाभ
प्रत्येक निवडणुकीत हजारो लोकांना भौगोलिक अडथळ्यामुळे, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार ंिकवा इतर कारणांमुळे नोंद असलेल्या मतदारसंघात जाता येत नाही. अशा लाखो मतदारासांसाठी निवडणूक आयोगाचा हा निर्णय संजीवनी ठरणार आहे. मतदानाची टक्केवारीही वाढण्यास मदत होणार आहे.

मतदान ओळखपत्र आता मोबाईलवर
भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० ला करण्यात आली. त्यामुळे दरवर्षी हा दिवस निवडणूक आयोग राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो. दरम्यान या कार्यक्रमावेळी बोलताना महाराष्टÑाचे मुख्य निवडणुक आयुक्त बलदेससिंग यांनीही महत्त्वाची माहिती दिली. सोमवारपासून भारत निवडणूक आयोगाचे ई मतदार ओळखपत्र (ई ईपिक) वाटप सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदारांना त्यांचे ओळखपत्र मोबाईल अथवा संगणकावर डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

के.पी.शर्मा ओलींची पक्षातूनच हकालपट्टी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या