26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयसावरकर नसते तर खरा इतिहास समजला नसता - अमित शहा

सावरकर नसते तर खरा इतिहास समजला नसता – अमित शहा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इतिहास बदलणे हा फक्त सरकारांचा विषय नव्हे, असे सांगतानाच स्वातंत्र्यवीर सावरकर नसते तर इतिहासातील १८५७ च्या युध्दासह इतिहासातील अनेक गोष्टी व सत्ये उजेडात आली नसती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितले.

बाजीराव पेशवा, शीख धर्मगुरू गुरू गोविंदसिंह, दुर्गादास राठोड यासारख्या महापुरूषांना योग्य न्याय मिळेल असे इतिहास लेखन व्हायला हवे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिल्लीत ‘महाराणा- हजार वर्षांचे धर्मयुध्द’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात शहा म्हणाले की, काही लोकांनी इतिहास विकृत केला हे सत्य आहे. त्यांना जे वाटले ते त्यांनी लिहीले.

इतिहासाकारांनी भूतकाळातील गौरवास्पद क्षण पुरर्जीवीत केले तरच उज्ज्वल भविष्याच्या उभारणीस मदत मिळेल. ८०० ते ९०० वर्षांहून जास्त काळ आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी युध्दे केली तेव्हा आम्ही वाचलो आहोत. आमच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी लोकांनी बलिदान दिले आहे. मात्र ज्यांनी इतिहास विकृत केला त्यांची भाषा आम्ही कशाला स्वीकारली ?
सवाई मानसिंहांनी अकबराशी करार केला तर आम्ही त्यांच्या सवाई महालाला हवाई महाल म्हणू लागलो.

यासारख्या गोष्टींतील असत्य जगासमोर आणून सत्य जगासमोर मांडणे ही इतिहासकारांची जबाबदारी आहे. इतिहासकारांनी फक्त मुघल साम्राज्याचे वर्णन केले. मात्र त्याआधी भारतात पांड्य साम्राज्य ८०० वर्षे, अहोम राज्य ६५०वर्षे, पल्लव व चालुक्य राजवंश प्रत्येकी ६०० वर्षे, मौर्य साम्राज्य ५०० वर्षे तर गुप्त साम्राज्य ४०० वर्षे याच देशात राहिले आहे. या साम्राज्यांचे वर्णन का दडपले गेले? ते भारताच्या इतिहासात का प्रस्थापित केले गेले नाही असाही सवाल शहा यांनी विचारला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या