इंदूर : सेल्फी घेण्याच्या नादात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे, मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये ही घटना घडली. मध्य प्रदेशात खरगोन जिल्ह्यातील कुटुंब जाम घाट येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.
करवा चौथनंतर इंदूरमध्ये राहणारे विकास बाहेती हे पत्नी नीतू आणि मुलीसह खरगोनच्या जाम घाट फिरण्यासाठी आले होते. जाम घाट फिरून येत असताना घाट मार्गात हे कुटुंब थांबले होते, एकाठिकाणी सेल्फी घेण्याच्या नादात नीतू यांचा पाय घसरला, त्यानंतर त्या दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला.
नीतू दरीत कोसळल्याने पती विकासला धक्का बसला. नीतूचा आवाज ऐकून घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. मंडलेश्वर ठाण्याचे पोलीस अधिकारी संतोष सिसोदिया म्हणाले की, प्रथमदर्शनी हा अपघात वाटत आहे. सध्या पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. महिलेचा मृतदेह पोस्टमोर्टम करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.
तो अहवाल प्रसिद्ध होताक्षणी ठाकरे सरकार पडणार