24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयमहिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले २ किलो सोने

महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले २ किलो सोने

एकमत ऑनलाईन

कोलकाता : येथील नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परदेशातून येणा-या प्रवाशांची तपासणी करत असताना पोलिसांना एका महिलेकडे २ किलो सोने सापडल आहे. हे सोने बॅग किंवा खिशात नसून चक्क तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आढळून आले आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून पोलिसही चक्रावले आहेत.

कोलकात्यातील या विमानतळावर सीमाशुल्क विभागाचे अधिकारी परदेशातून येणा-या प्रवाशांची तपासणी करत होते. त्यावेळी एका परदेशी महिलेचे वागणे सुरक्षारक्षकांना संशयास्पद वाटते. म्हणून त्यांनी तिची झडती घेतली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार या अधिका-यांसमोर उघडकीस आला. या महिलेने आपल्या अंतर्वस्त्रात आणि प्रायव्हेट पार्टमध्ये जवळपास २ किलो सोने लपविले होते. सुदानवरून परतलेल्या या महिलेकडून १ हजार ९३० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत ९६ लाखाहूनही अधिक आहे. सुदानची नागरिक असलेल्या लामिस शरीफ या महिलेची अधिका-यांनी झडती घेतली. तिची विचारपूस केल्यावर तिच्या उत्तरांमध्ये गोंधळ आढळल्याने त्यांना शंका आली. झडती घेतल्यावर महिलेच्या अंतर्वस्त्रात दोन पाकिटांमध्ये सोने आढळून आले.

महिला ताब्यात
तपास करणा-या महिला अधिका-यांना या परदेशी महिलेच्या प्रायव्हेट पार्टजवळ सोन्याची पावडर आढळून आली. त्यामुळे अधिक तपास केला असा, तिच्या प्रायव्हेट पार्टमधून सोन्याच्या पावडरने भरलेल्या दोन कॅप्सूल्स आढळल्या. तिच्या शरीरात आणखी काही कॅप्सूल्स असल्याचे तिने अधिका-यांना सांगितले आहे. या महिलेला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या