26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयसीआरपीएफमध्ये महिला कमांडो

सीआरपीएफमध्ये महिला कमांडो

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलिस दलात प्रथमच कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट अ‍ॅक्शन कमांडो युनिटमध्ये महिला कमांडोचा समावेश होणार आहे. ८८ व्या ऑल महिला बटालियन रायजिंग डेच्या मुहुर्तावर या महिला कमांडरला यात सामिल करून घेतले आहे, असे सीआरपीएफने आज म्हटले. केंद्रीय राखीव पोलिस दलात आज प्रथमच ३४ महिला कमांडोंचा समावेश झाला असून, त्यांना ३ महिने विशेष कमांडो ट्रेनिंग पूर्ण करावे लागणार आहे.

या महिला कमांडो नक्षलवाद्यांविरूद्धच्या मोहिमेत नेतृत्व करतील. त्यासाठी सीआरपीएफच्या सर्व ६ महिला बटालियनमधून ३४ महिला जवानांची निवड करण्यात आली आहे. नक्षली भागात आणि जंगलात टिकून राहण्यासाठी त्यांना अवघड सरावातून जावे लागणार आहे. ८८ व्या ऑल इंडिया महिला बटालियनच्या समारोहादरम्यान महिला कमांडोंना यात सामिल करून घेत सीआरपीएफने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. प्रशिक्षणानंतर महिला कोब्रा कमांडोना नक्षलग्रस्त भागात तैनात करण्यात येईल, अशी माहिती सीआरपीएफचे प्रमुख ए. पी. माहेश्वरी यांनी शनिवारी दिली.

सीआरपीएफमध्ये १९८६ मध्ये पहिली महिला बटालियन तयार करण्यात आली होती. महिला बटालियनच्या ३५ व्या स्थापना दिनानिमित्त महिला जवानांची कोब्रा प्रशिक्षणासाठी औपचारिकरित्या निवड झाली. निवड झालेल्या ३४ महिला जवानांनी स्वेच्छेने त्यांची नावे कोब्रा युनिटमध्ये जाण्यासाठी दिली होती. याशिवाय आणखी २०० महिला जवानांनीही या युनिटमध्ये सहभागी होण्यासाठी आपली नावे दिली आहेत, अशी माहिती सीआरपीएफचे डीआयजी एम. दिनाकरन यांनी दिली. कोब्रा युनिटमध्ये समावेश होणा-या जवानांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर कठोर निकष पूर्ण करावे लागतात.

सीआरपीएफच्या पुरुष जवानांसोबत होणार तैनाती
महिला जवानांची शारीरिक क्षमता आणि तांत्रिक समज वाढेल. यात गोळीबार आणि विशेष शस्त्रे, नियोजन, फील्ड क्राफ्ट, स्फोटके आणि जंगलात जगण्याच्या कौशल्यासह चांगले प्रशिक्षण दिले जाईल, असे सीआरपीएफच्या एका अधिका-याने सांगितले. कोब्रा कमांडोचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला कमांडोंना पुरुष कमांडोसह नक्षलग्रस्त भागात तैनात केले जाईल, असे ते म्हणाले.

सीआरपीएफमध्ये १० कोब्रा युनिट
सीआरपीएफमध्ये २००८-०९ मध्ये दोन कोब्रा युनिट बटालियनची स्थापना केली गेली. २००९-१० मध्ये बटालियनची संख्या वाढवून ४ वर करण्यात आली. त्यानंतर २०१०-११ मध्ये आणखी ४ बटालियन तयार झाल्या. सीआरपीएफकडे सध्या २४६ बटालियन आहेत. यामध्ये २०८ अधिकारी, ६ महिला, १५ आरएएफ, १० कोब्रा, ५ सिग्नल, एक स्पेशल ड्युटी ग्रुप आणि संसदेतील सुरक्षेसाठी एका ग्रुपचा समावेश आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या