32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयकांग्रेसकडून महिलांना दरमहा २ हजार रुपये मिळणार - प्रियांका गांधी

कांग्रेसकडून महिलांना दरमहा २ हजार रुपये मिळणार – प्रियांका गांधी

एकमत ऑनलाईन

तेजपूर : आसामच्या निवडणुक प्रचाराची जबाबदारी काँग्रेसकडून महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी घेतली आहे. मंगळवारी तेजपूरमधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी महिलांना आकर्षित करण्यासाठी गृृहिणीसन्मान योजनेची घोषणा केली. योजनेंतर्गत आसाममध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास दरमहा महिलांना २ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.

प्रियांका गांधी सध्या दोनदिवसांच्या आसाम दौ-यावर आहेत. मंगळवारी त्यांनी सुधारु द स्टेट या ठिकाणाला भेट दिली. तेथील चहाच्या मळ्यातील महिला कामगारांची भेट घेत त्यांच्याबरोबर चहाची पाने तोडण्याचा उपक्रम केला. त्यानंतर दुपारी त्यांनी तेजपूर येथे प्रचारसभाही घेतली. सभेत त्यांनी राज्यातील महिलांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय योजना सादर केली. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास दरमहा महिलांना २ हजार रुपयांची आर्थिक मदत गृहिणी सन्मान योजनेंतर्गत देऊ . तसेच महिला चहा कामगारांनाही दररोज ३६५ रुपयांचा भत्ता देऊ , असे आश्वासन त्यांनी दिले.

तसेच राज्यात भाजप सरकारला तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवता आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसची सत्ता आल्यास ५ लाख तरुणांना नौकरी देण्याची हमीही त्यांनी दिली. सीएए या राज्यात लागू केला जाणार नाही तसेच दरमहा २०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणाही त्यांनी केली.

भाजपवर केली दुतोंडीपणाची टीका
प्रियांका गांधी यांनी आपल्या प्रचार दौ-यात भाजपवर दुतोंडीपणाची भुमिका घेत असल्याचा घणाघात केला. देशभरात घराघरात घुसून भाजपचे लोक सीएए लागू करु म्हणतात. मात्र आसाममध्ये आले की गप्प बसतात अशी टीका केली. महिलांनी व तरुणांनी मतदान करताना जागरुकपणे करावे, जो पक्ष तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवेल.

मार्च ते मेदरम्यान उष्णतेत वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या