30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home राष्ट्रीय दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विना-आवश्यक सेवांशी संबंधित ५० टक्के सरकारी कर्मचारी घरातूनच काम करतील, असा निर्णय दिल्ली सरकारकडून घेण्यात आला आहे.

हा नियम ग्रेड वन आणि वरिष्ठ अधिका-यांना लागू होणार नाही सरकारी कार्यालयांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग नियमांचे पालन करता येईल, यासाठी दिल्ली सरकार असा निर्णय घेत आहे. मात्र, हा नियम ग्रेड वन आणि वरिष्ठ अधिका-यांना लागू होणार नाही. तसेच, हा नियम आरोग्य, स्वच्छता, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, होमगार्ड, वीज, पाणीपुरवठा अशा महत्वाच्या सेवांना लागू होणार नाही. एका महिन्यानंतर कोरोनाची परिस्थिती बदलल्यास सरकार नवीन आदेश जारी करेल.

खासगी कंपन्यांनाही सल्ला
या आदेशात खासगी कंपन्यांच्या कार्यालयांनाही ५० टक्के कर्मचा-यांसोबत काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कंपन्यांनी कामाचे तास आणि कर्मचा-यांची संख्या कमी करावी. शक्य असेल तर कर्मचा-यांकडून घरून काम करून घ्यावे, असे या आदेशात म्हटले आहे. दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत ८,९९८ जणांचा मृत्यू दिल्लीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ५,६१,७४२ वर पोहोचली असून त्यापैकी ५,१६,१६६ लोक बरे झाले आहेत. तर सध्या ३६,५७८ लोक संक्रमित आहेत. शनिवारी दिल्लीतील कंटेन्टेंट झोनची संख्या वाढून ५३३१ झाली. तसेच, शनिवारी कोरोनाचे ४,९९८ नवे रुग्ण आढळले. तर दिल्लीत आतापर्यंत कोरोनामुळे ८,९९८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

केंद्र सरकारला सत्तेची नशा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या