24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयरेल्वे स्थानकावरून क्वारंटाइनच्या भीतीने मजुरांचा पळ

रेल्वे स्थानकावरून क्वारंटाइनच्या भीतीने मजुरांचा पळ

- आसाम पोलिसांची ६१ जणांवर कारवाई

एकमत ऑनलाईन

दिब्रुगढ: वृत्तसंस्था
श्रमिक ट्रेनमधून उडी मारण्यासाठी मजुरांनी एमर्जन्सी चेन खेचल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वे आणि आसाम पोलिसांनी कारवाई करत ६१ जणांना अटक केली आहे. तर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही ट्रेन मुंबईहून आलेली होती. यावेळी काही मजुरांनी क्वारंटाइन व्हावे लागू नये, यासाठी ट्रेनची चेन खेचून उडी मारुन पळ काढला होता.

ही ट्रेन मुंबईहून आसाम येथील दिब्रुगढ येथे चालली होती. ही लोकमान्य टिळक श्रमिक ट्रेन आसाममधील होजाई रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर चेन खेचण्याचं मजुरांनी ठरवलं होतं. घटना घडली त्याच रात्री रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई करत होजाई रेल्वे स्थानकावर उतरलेल्या ५६ प्रवाशांना अटक केली. तर इतरांना आसाम पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या सहाय्याने बुधवारी सकाळी अटक केली.

Read More  भारताचे चीनला जशाच तसे उत्तर!

ट्रेनमधून पळ काढलेल्या एका प्रवाशाला होजाई मार्केटमधून अटक करण्यात आली. सर्व मजूर मुंबईहून परतलेले असल्याने घटनेची माहिती मिळताच होजाई रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ आणि भीती निर्माण झाली. मुंबई कोरोनाच्या हॉटस्पॉटच्या यादीत असून ४० हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईहून हजारो, लाखोंच्या संख्येने मजूर आपल्या राज्यात परतत आहेत.

आसाममध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ पहायला मिळत आहे. बुधवारी आसाममध्ये १११ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासोबत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ६७२ वर पोहोचली आहे. तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या