20.4 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home राष्ट्रीय जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांकडून पंतप्रधान मोदींचे कौतूक

जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांकडून पंतप्रधान मोदींचे कौतूक

कोरोनाविरोधात लढाईतील कामाचा उल्लेख ; ट्विटरवरुन मानले आभार

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधातील लढाईत भारताच्या योगदानाचे, प्रयत्नांचे कौतुक केले आहे. कोरोना लस ‘कोवॅक्स’ जगभरात उपलब्ध करून देण्यासाठी भारताने दाखवलेल्या कटिबद्धतेबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

टेड्रोस घेब्रेसस यांनी गुरुवारी एक ट्विट केले असून पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. कोवॅक्सच्या निर्मितीसाठी आणि जगभरातील नागरिकांसाठी कोरोनावर लस उपलब्ध करून देण्याच्या कटिबद्धतेसाठी आभार मानत असल्याचे घेब्रेसस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दूरध्वनीवरून झालेली चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जागतिक पातळीवरील आरोग्य व्यवस्था, संशोधन आणि प्रशिक्षणात भारताचे सहकार्य मिळणार असल्याचा विश्वास घेब्रेसस यांनी व्यक्त केला.

सर्वच आजारांकडे लक्ष देण्याची गरज :मोदी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संसर्गासोबत दोन हात करत असताना इतर आजारांकडे दुर्लक्ष करता कामा नये याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

जनमतांचा कौल आम्हालाच होता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या