24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयचंदीगडमध्ये मानवी ध्वजाचा जागतिक विक्रम

चंदीगडमध्ये मानवी ध्वजाचा जागतिक विक्रम

एकमत ऑनलाईन

चंदीगड : भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सरकारने हर घर तिरंगा मोहीमही सुरू केली आहे. यावेळी देशबांधवांनी घरोघरी तिरंगा फडकवावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.

याच निमित्ताने आज चंदिगडमध्ये एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत तब्बल ७५०० विद्यार्थ्यांनी एकत्र उभे राहून मानवी ध्वज बनवला. शहरातील सेक्टर-१६ क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी सकाळी १०.३० वाजता नागरिकांनी एकत्रित येऊन राष्ट्रध्वज तिरंगा मानवी ध्वज साकारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या खास कार्यक्रमात चंदिगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हवेत फडकणा-या तिरंग्यासारखा आकार या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी स्टेडियम दुमदुमले होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वे वर्ष पूर्ण होणार आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला. याच निमित्ताने यावर्षी आपण अमृत महोत्सव साजरा करणार आहोत.

हर घर तिरंगा मोहीम
२०२२ मध्ये स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करण्याच्या तयारीत भारत युद्धपातळीवर गुंतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर साज-या होणा-या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा हा एक भाग आहे. या निमित्ताने लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रवृत्त करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

चंदीगडमध्ये मानवी ध्वजाचा जागतिक विक्रम
– तब्बल ७५०० विद्यार्थ्यांनी बनवला मानवी ध्वज

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या