28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeराष्ट्रीयथंडीचा कहर, कानपुरात २५ ठार

थंडीचा कहर, कानपुरात २५ ठार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट आली असून कानपूरमध्ये सर्वाधिक थंडी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हृदयविकार येण्याचे प्रकार वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली.

लक्ष्मीपत सिंघानिया हृदयरोग संस्थेचे संचालक डॉ.विनय कृष्णा यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या समस्या घेऊन ७२३ रुग्ण आले होते. त्यापैकी ४१ रुग्णांना दाखल करुन घेतले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच १५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचवेळी उपचारादरम्यान ७ रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, उन्नावच्या ६५ वर्षीय संध्या, कल्याणपूरच्या ७४ वर्षीय राजोल आणि हलत हॉस्पिटलमध्ये आणलेल्या कन्नौजच्या ७० वर्षीय झाकीर यांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला आहे.

राजस्थान-६ अंश तापमानाने गारठून गेले आहे. तर शिमला-नैनितालपेक्षा जास्त थंडी ही दिल्लीत पडत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज तापमान १.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत थंडी हवेमुळे आँरेज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार ७ जानेवारीपासून डोंगराळ भागात पुन्हा बर्फवृष्टी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील मैदानी भागात तापमानात आणखी घसरण होऊ शकते त्यामुळे थंडी वाढणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या