25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeतंत्रज्ञानयुजर्सचा डेटा तिस-या पार्टीला देणार नाही लिहून द्या - सर्वोच्च न्यायालय

युजर्सचा डेटा तिस-या पार्टीला देणार नाही लिहून द्या – सर्वोच्च न्यायालय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्हॉट्सऍपने जाहीर केलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरून वाद सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी इंस्टंट मेसेजिंग ऍपला फटकारले आहे. व्हॉट्सऍपला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, तुम्ही लिहून द्या की, तिस-या पार्टीला युजर्सचा डेटा देणार नाही. फेसबुक, केंद्र सरकार आणि व्हॉट्सऍपला न्यायालयाने या प्रकरणी नोटीस जारी केली आहे. त्याचबरोबर ४ आठवड्यांसाठी या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

चीफ जस्टीस ऑफ इंडिया एस़ ए़ बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने म्हटले आहे की, आपल्या खासगीकरणाबाबत लोकांना चिंता आहे. २ किंवा ३ ट्रिलियनची व्हॉट्सऍप कंपनी असेल. पण लोकांचा खासगीपणा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. तो सुरक्षित ठेवणे तुमचे कर्तव्य आहे. २०१६ साली आलेल्या व्हॉट्सऍप पॉलिसी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आला आहे.

व्हॉट्सऍपच्या प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात २०१६ मध्ये कर्मण्य सिंह सरीन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानुसार फेसबुकने जेव्हा पासून व्हॉट्सऍपला खरेदी केले आहे़ तेव्हापासून इंस्टंट मेसेंंिजग ऍप आपल्या युजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर करत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या संवैधानिक पीठाकडे प्रलंबित आहे.

कोणतीही माहिती शेअर करीत नाही : सिब्बल
न्यायालयात बोलताना याचिकाकर्त्याचे वकिल श््याम दीवान म्हणाले, युरोपीय युजर्सच्या तुलनेत व्हॉट्सऍप भारतीय युजर्ससोबत भेदभाव करते. व्हॉट्सऍपकडून बाजू मांडणारे वरिष्ठ वकिल कपिल सिब्बल म्हणाले, कोणतीही संवेदनशील माहिती तिस-या पक्षासोबत शेअर केली जात नाही. तसेच दिल्ली उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असल्याचेही ते म्हणाले.

खासगीकरण मुलभूत अधिकाराचा भाग : मेहता
केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता न्यायालयात म्हणाले, कायदा असेल किंवा नसेल पण खासगीकरणाचा अधिकार मुलभूत अधिकाराचा भाग आहे. मुलभूत अधिकारांचे रक्षण व्हॉट्सऍपने करायला हवे. त्यांनी डेटा शेअर करता कामा नये.

चिनी दूतावासासमोर नागरिकांचे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या