27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयचुकीच्या धोरणांमुळेच देशात भूकबळी

चुकीच्या धोरणांमुळेच देशात भूकबळी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जागतिक भूकबळीच्या २०२०च्या स्थितीबाबत भारताच्या अवस्थेवरुन त्यांनी मोदी सरकारला जबाबदार धरले असून, चुकीच्या धोरणांमुळेच देशात भूकबळी आणि कुपोषण वाढले असल्याचे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध मुद्यांवरुन नेहमीच नरेंद्र मोदींना आणि भाजपा सरकारला धारेवर धरत असून, अनेक विषयांना वाचा फोडत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत़ गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी भारताच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत, सुधारित कृषी कायद्यांबाबत, युवकांच्या बेरोजगारीबाबत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. सध्या परत एकदा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

भारतातील गरिब भूकेला आहे़ कारण सरकार फक्त आपल्या काही मोजक्याच मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे. या रिपोर्टनुसार, सध्या भारत ९४ व्या स्थानावर आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत २०१४ साली ५५ व्या स्थानावर होता. २०१९ मध्ये भारत १०२ क्रमाकांच्या स्थानावर आला होता़ तर आता २०२० मध्ये ९४ व्या स्थानावर भारत आहे.

गांधी यांनी भूकबळीनुसार देशांची क्रमवारी असलेल्या एका आलेखाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये इंडोनेशिया, नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्ताननंतर भारताचा क्रमांक लागत असल्याचे दिसून येत आहे. याद्वारे इतर देशांहून भारताची परिस्थिती गंभीर आहे, हे दिसून येत आहे. सध्या राहुल गांधी यांनी याप्रकारे ट्विटरवरुन मोदी सरकारवर टीका करण्याचा सपाटाच लावला आहे. याआधीही त्यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळण्यावरुन इतर देशांपेक्षा भारताला आलेल्या अपयशावरुन मोदी सरकारवर टिका केली होती.

केवळ उद्योगपतींना मोठे केले जातेय
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील हे सरकार फक्त काही मोजक्या उद्योगपतींचेच खिसे भरण्यात व्यस्त आहे आणि त्यांच्यासाठीच काम करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

इतर गरीब देशांची परिस्थिती चांगली
भारत या क्रमवारीत तब्बल ९४ व्या स्थानावर असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली आहे. तर आपल्यापेक्षा गरिब आणि अविकसित असणा-या देशांची याबाबतची परिस्थिती अधिक चांगले असल्याचे हा रिपोर्ट सांगतो, असे राहुल गांधींनी माहिती दिली आहे.

दक्षिण भागातील पूरग्रस्तगावांना जनहीतचे प्रभाकर देशमुखांनी दिली भेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या