24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीययासिन मलिक टेरर फंडिंग प्रकरणात दोषी

यासिन मलिक टेरर फंडिंग प्रकरणात दोषी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काश्मीरी फुटीरतावादी नेता यासीन मलिकला दिल्ली न्यायालयाने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले आहे. एनआयने याबाबत ट्वीट केले आहे. दिल्लीच्या एका न्यायालयात यासीन मलिकने दहशतवादासाठी फडिंग काल्याचे आरोप स्वीकारले होते, त्यानंतर आज न्यायालयाने मलिकला दोषी ठरवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिन मलिकला पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत त्याच्या आर्थिक मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

१० मे रोजी मलिकने दिल्ली न्यायालयासमोर कठोर बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायदा अंतर्गत असलेल्या सर्व आरोपांसह दोषी असल्याचे कबूल केले होते. मलिक याच्यावर यूएपीएचे कलम १८ (दहशतवादी कृत्य करण्याचा कट), आणि २० (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असणे) आणि कलम १२०-ई (गुन्हेगारी कट) आणि 124-अ (देशद्रोह) चे आरोप ठेवण्यात आले आहेत. हे प्रकरण २०१७ मध्ये काश्मीर खो-यातील कथित दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या